सावखेडासीमच्या बेपत्ता तरुणाचा अखेर मृतदेहच लागला हाती

0

यावल : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली वड्री धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी घडली होती. घटनेच्या 24 तासानंतर अखेर त्या तरुणाचा मृतदेहच हाती लागल्याने सावखेडासीम गावात हळहळ व्यक्त होत आहे. वसीम फिरोज खाटीक (20) असे मृत तरुणाचे नाव आहे.

धरणात पोहताना बुडाला होता तरुण
यावल तालुक्यातील सावखेडासीम येथील वसीम फिरोज खाटीक (20) हा रविवार, 26 जुलै मित्र व भावासह वड्री येथील धरणात पोहण्यास गेला असता सायंकाळी 4.45 वाजेच्या सुमारास धरणात बुडाला होता. स्थानिक पोहणार्‍यांच्या मदतीने शोध घेण्यात आला असता तरुण आढळला नव्हता मात्र अखेर घटनेच्या 24 तासानंतर फिरोज वसीम खाटीक या तरूणाचा मृतदेह हाती लागला आहे. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून याबाबत हाजी शेख हकीम शेख अल्लाउद्दीन यांच्या खबरीनुसार यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी असलम खान हे करीत आहेत.