दहिगाव : तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 लसीकरणासाठी सावखेडासीम प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज झाले असून सोमवारपासून ग्रामीण भागात लसीकरणाच्या तिसर्या टप्प्यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व 45 ते 49 वर्ष कोमॉरबीड (गंभीर आजार असलल्या) नागरीकांना प्रतिबंधक लस टोचण्याच्या मोहिमेला सुरूवात झाल्याचे सावखेडासीम वैद्यकीय अधिकारी डॉ.नसीमा तडवी यांनी सांगितले.
तिसर्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात
देशासमोर कोरोनाचे संकट उभे असून यावर मात करण्यासाठी देश व महाराष्ट्रासह जिल्ह्यात लसीकरणास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात पहिल्या व दुसर्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर, फ्रन्टलाईन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. या नंतर तिसर्या टप्प्यातील लसीकरणाला 1 मार्चपासून शहरी भागात सुरुवात झाली आहे तर 8 मार्चपासून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरणाला सुरुवात होत आहे. यात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व 45 ते 59 वयोगटातील कोमॉरबीड (गंभीर आजार असलेले) नागरीकांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच लस घेण्याअगोदर जेवण करून येणे गरजेचे आहे. डॉ.गौरव भोईटे व डॉ.नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक एल.जी.तडवी व आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, सावखेडासीम व कार्यक्षेत्रातील उपकेंद्र दहिगाव, मोहराळा, कोळवद, सातोद व जामन्या येथे लसीकरण सत्राचे नियोजन करून पथक तयार करण्यात आले.