सावखेडासीम येथे अतिसाराची लागण

0

यावल । यावल तालुक्यातील सावखेडासीम येथे अतिसारची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे 12 अतिसारचे रूग्ण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले असुन त्यांची प्रकृती चिंताजणक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका वैद्यकिय अधिकार्‍यांसह आरोग्य कर्मचारींचे पथक येथे तळ ठोकुन आहे. रूग्णामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

उलट्या व जुलाबाचा त्रास सुरुच
सावखेडासीम येथे रविवारी काही ग्रामस्थांना अचानक उलट्या व जुलाबचा त्रास सुरु झाल्याने रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यात त्यांचेवर उपचार करतेवेळी त्यांना अतिसारची लागण झाल्याचे निदान समोर आले आहे. आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रूग्णामध्ये शकीला तडवी, नजमा तडवी , मिना तडवी, हपशानबी तडवी, रहेमान तडवी, शिवराम पाटील यांना अतिसाराची लागण झाली आहे. जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. बी.आर.पाटील तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे, डॉ. उमाकांत बारी यांनी गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. ज्या भागातुन रूग्ण आले त्या भागात वैद्यकिय पथकाने सर्च मोहिम राबवली व दुषीत पाण्याचे नमुने तपासणी करीता पाठविले आहे. त्याबाबतचा संपुर्ण अहवाल आल्यानंतरच दुषीत पाण्याबाबतची परिस्थितीचे आकलन होईल अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.