वरखेडी । या परिसरात सोमवारी रात्री वादळी वार्या सह जोरदार पाऊस झाल्याने बहुळा नदीला पहिल्याच पाऊसात पूर आले. यात वरखेडी येथूनच जवळच असलेल्या सावखेडा खुर्द व सावखेडा बुद्रुक दोन्ही गावांना जोळणार्या पुलावरून बीएसएनएलची केबल गेली होती. तिच्यावर केलेले सिमेंटचे काम व पाईप पहिल्याच पुरात वाहून गेले व रहदारीस आडचण निर्माण झाली असून भविष्याच्या दृष्टीने केबलचे योग्य रित्याने काम करण्यात यावे. जेणे करून पावसाळात ग्रामस्थाचे हाल होणार नाहीत. तर परिसरातील भोजे, सावखेडा, राजुरी, वरखेडी या गावांची पाणीटंचाई दूर झाली असून राजुरी धरण्यातही पहिल्याच पावसात बर्यापैकी पाणी आले असून शेतकरीच्या शेतीमशागती साठी धावपळ सुरु झाली आहे.