यावल। तालुक्यातील सावखेडा येथील इसमाने शेतात असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार 27 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. सावखेडा येथील रहिवासी लुकमान उमेदा तडवी (वय 32) याने 27 रोजी रात्री 9.15 मिनिटांनी सावखेडा शिवारातील निवृत्ती किरंगे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतला.
याबाबत पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सपकाळे हे तपास करीत आहे.