सावखेडा येथे हातमजुराचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Sawkheda of agricultural laborer in Madhya Pradesh. Death by drowning in a farm here पाचोरा : मध्यप्रदेशातून उदरनिर्वाहानिमित्त आलेल्या 30 वर्षीय मजुराचा शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महेश उर्फ रणतोष सुमरसिंग पावरा (30, कालिपहाड, ता.सेंधवा, मध्यप्रदेश) असे मयत शेतमजुराचे नाव आहे.

मद्याच्या नशेत शेतमजुर बुडाल्याचा संशय
मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्याील ादिवासी समाजाचे दोन कुटुंबे गेल्या चार वर्षांपासून येथील अण्णा भिकारी परदेशी यांच्या शेतात कामासाठी आले आहेत. 15 दिवसांपूर्वी त्यांचा जवळचा नातेवाईक असलेला महेश उर्फ रणतोष सुमरसिंग पावरा हा त्यांच्यासोबत कामासाठी सावखेडा खुर्द येथे आला होता. मंगळवार, 13 रोजी दुपारी दोन वाजता महेश व त्याचे सोबत काम करत असलेल्या दोघांनी मद्य प्राशन केले तर महेशने शेततळ्यात आंघोळ करावयाची असल्याचा आग्रह धरत तळ्यात उतरला मात्र 15 फूट पाण्यात तो बुडाला. सोबतच्या मजुरांनी आरडा-ओरड केली मात्र उशिर झाला होता तर ही घटना शेतमालक अन्ना परदेशी यांना कळताच त्यांनी व माजी सरपंच जयसिंग परदेशी यांनी गावातील गजानन पाटील, समीर तडवी, अरुण तडवी या पोहणार्‍यांना घटनास्थळी नेवून महेश याचा मृतदेह बाहेर काढला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय माळी, दिपकसिंग पाटील, उज्वल जाधव, रविंद्र वाडीले यांनी पंचनामा केला. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कालीपहाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.