सावतरसीमच्या वृद्धाचा दीर्घ आजाराने मृत्यू

0

वरणगाव- सावतरसीम येथील उत्तम दामू कोळी (65, सावतर निंभोरा, ता.भुसावळ) या इसमाचा दीर्घ आजाराने 9 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने जिल्हा पेठ पोलिसात डॉ.संदीप पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही नोंद सोमवारी वरणगाव पोलिसात वर्ग करण्यात आली. तपास नाईक मुकेश जाधव करीत आहेत.