एरंडोल । श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी एरंडोल येथील विजय पंढरीनाथ महाजन यांची तर उपाध्यक्षपदी दिनेश भाऊराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अन्य पदाधिकार्यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड हि नुकत्याच संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथे झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. सदर निवडी प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.महाजन यांनी काम पहिले.
मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे
सुकलाल महाजन-सचिव, जयराम माळी – सहसचिव, सुरेश माळी – वसतिगृह अधीक्षक, राजेंद्र महाजन – कोषाध्यक्ष, अरुण माळी – चेअरमन म.फुले हायस्कूल एरंडोल, सुदर्शन महाजन – चेअरमन नुतन प्राथमिक विद्यामंदिर एरंडोल, शरद माळी – चेअरमन महात्मा फुले हायस्कूल धरणगाव, मधुकर रोकडे – चेअरमन नुतन प्राथमिक विद्यामंदिर धरणगाव तर संचालक म्हणुन शंकरराव पाटील, दिलीप रोकडे, रवींद्र महाजन, रमेश महाजन, मनोहर महाजन, भिला महाजन, धनंजय महाजन, विजय थोरात, यादवराव पाटील यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे मुख्याध्यापक जे.ए.आहिरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.