सावदा उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे यांचा राजीनामा

0

सावदा :- पालिकेच्या उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी 5 रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे.

दुपारी 12 वाजता होणार्‍या सभेत पीठासीन अधिकारी म्हणून रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे असतील. लोखंडे यांच्या राजीनाम्यानंतर नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी सध्या येथे हालचाली सुरू आहेत. सागीराबी सय्यद तुकडू यांचे नाव आघाडीवर असून त्यांची निवड जवळपास निश्चित मानले जात आहे.