सावदा। साप्रमाणे सावदा पालिकेची सर्वसाधरण सभा दि 20 रोजी पालिका सभागृहात झाली. सभेचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले या होत्या सभा सुरु झाल्यावर लागलीच सत्ताधारी सदस्यांनी उजवीकडे तर विरोधी सदस्यांनी डावीकडे बसावे असे सांगितले मात्र यावर सर्व विरोधी सदस्य यांनी आक्षेप घेतला तर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी आजवरचे न.पा. इतिहासात कधीही सदस्य वेगवगळे बसलेले नाही, असा आरोप करत विरोधकांनी घेतला पवित्रा श्रद्धांजलीनंतर नगरपालिका सभाच्या कामकाजास झाली सुरूवात यानंतर नगरसेवक राजेश वानखेडे यांनी नुकत्याच प्रमोद सरोदे यांनी केलेली आत्महत्या तसेच सत्ताधारी गटनेते अजय भारंबे यांनी काही दिवसापूर्वी येथील अल्पवयीन अत्याचारग्रस्त मुलीने केलेली आत्महत्या या दोघांचे श्रद्धांजली ठराव मांडला व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर सभेचे कामकाज सुरु झाले प्रथम मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले. यानंतर सभेसमोर असलेले विषय घेण्यात आले.
यात प्रथम विविध प्रशासकीय समित्या गठीत करणे या विषय घेण्यात आला. यात वाचनालय समिती, शाळा समिती, शाळा समन्वय समिती, तसेच वृक्षसंवर्धन समिती इत्यादी समित्या गठीत करण्यात आल्या. विषय 12 प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयास ओम कॉलनीतील ओपन स्पेस बगीचा विस्तारीकरणास द्यावा यावर नगरसेविका रंजना भारंबे यांनी याच जागेसाठी दुसरा एक अर्ज आणला.
यांची होती उपस्थिती
दरम्यान याच सभेत तडवी वाडा परिसरात कम्युनिटी हॉल व जिमखाना उभारणे विविध भागात रस्ते तयार करणे यासह अनेक विकास कामना देखील मंजुरी देण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे, सत्ताधारी गट नेते अजय भारंबे विरोधी गट नेते फिरोज खान हबीबुल्ला खान, यांचेसह दोन्ही कडील नगरसेवक, मुख्याधिकारी अमोल बागुल आदी उपस्थित होते सभेस बांधकाम अभियंता ध.शा.राणे. किरण चौधरी, सतीष पाटील आदींनी कामकाजात मदत केली.