सावदा येथील ढोकळे राम मंदिरात गंगा दशहार निमित्त आंब्याची आरास

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील चितोडे वाणी समाजाचे ढोकळे राम मंदिरात दि 27 रोजी सकाळी श्रीराम सीता, लक्ष्मण, तसेच देवीच्या मूर्तींना गंगा दशहार निमित्त सुंदर अशी आंब्याची आरास करण्यात आली होती यावेळी सकाळी मंदिरात आरती व आंब्याची आरास केल्यावर समाज बांधवांनी दर्शन घेतले, यावेळी या कार्यक्रमाचे यजमान अनिल मदनसेठ वाणी सर,

अरविंद त्र्यंबकसेठ अकोले, शैलेश विश्वनाथसेठ यावलकर,सुनील मधुकरसेठ अकोले,

,विशालअरविंदसेठ वाणी, महेंद्र किशोरसेठ वाणी यांचे सह अध्यक्ष सतिष खरे, सचीव दिपक श्रावगे, सुनील नवगाळे, बबन वाणी व समाज बांधव उपस्थित होते, सायंकाळी मंदिरात समाज बांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.