सावदा । स्वामीनारायण मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाही श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे सलग 43 वे वर्ष आहे. विशेष म्हणजे यावर्षी या सप्ताहात कथेचे वक्ता म्हणून येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी घन:श्यामप्रियदास यांचे शिष्य शास्त्री मानसप्रकाशदासजी हे राहणार असून ते कथेचे निरुपण करतील.
कथा 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत होत असून कथेची सुरवात करण्यात आली. 1 रोजी भरतजी आख्यान, 2 रोजी श्रीकृष्ण जन्म, 3 रोजी गोपाळकाला, 4 रोजी रासोत्स्व, 5 रोजी रुक्मिणी विवाह, 6 रोजी दत्त कथा, 7 रोजी गोकर्ण कथा असे अश्या कथा असून कथा संगीतमय असल्याने अनेक प्रसंग आपल्या सुमधूर संगीताने अनिल कानडे, व मधुकर मिस्त्री हे भजनाव्दारे देखील त्यांना साथ देणार आहे. कथेचे यजमान सागर प्रमोद चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी पूजा सागर चौधरी या असून कथेस भाविकांनी उपस्थितीचे आवाहन स्वामीनारायण मंदिराचे कोठारी घन:श्यामप्रियदास, भरत भगत, दिग्विजय भगत, धनराज भगत यांनी केले आहे.