सावदा येथे ब्राम्हण हितवर्धिनीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

0

सावदा। येथील ब्राह्मण हितवर्धिनी समितीतर्फे नुकताच समाजतील 26 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ येथील दत्त मंदिरात संपन्न झाला, यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजातील जेष्ठ सदस्य भास्कर कुलकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंडितराव गचके, मृदुला देशमुख, समितीचे अध्यक्ष श्रीकांत मटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक बाबा जोशी यानी केले यात त्यानी समितीतर्फे शहरात लवकरच बालसंस्कार केंद्र, पोळी भाजी केंद्र, महिला गृह उद्योग सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी समर्थ कुलकर्णी, विषुधा कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी सत्कार निमित्त मनोगत व्यक्त केले. तर 5 वर्षाच्या राधिका जोशी हिने गीतेमधील 18 वा अध्याय तोंडी म्हणून दाखविला. सूत्रसंचालन माधुरी कानडे यांनी केले तर आभार सानिका मटकरी यानी केले.