सावदा रेल्वे स्थानकावर दंड वसुल

0

जळगाव । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनात सावदा रेल्वे स्थानकवार 7 रोजी सकाळी 6 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान बसरेड करण्यात आली. त्यातुन 2 लाख 12 हजार 185 रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच अनाधिकृत 9 फेरी विक्रेत्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वेत घाण पसरविणार्‍या 15 प्रवाशांकडुन 1 हजारांचा दंड
या बसरेड मध्ये विभागीय मुख्य तिकिट निरीक्षक अजय कुमार, मुख्य तिकिट निरीक्षक एच.एस.अहालुवालिया, एन.पी. पवार यांच्या मार्गदर्शनात 40 तिकिट तपासनिस, 19 आरपीएफ, 3 लोहमार्ग पोलीस कर्मचारी हा चमु सकाळी 6 वाजेला भुसावळ स्थानकातुन बसने सावदा रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला. गाडी क्रमांक 11057 दादर-अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस, 11093 महानगरी एक्सप्रेस, 12167 वाराणसी एक्सप्रेस, 51187 भुसावळ -कटनी पॅसेंजर, 15018/15017 काशी एक्सप्रेस, 11072 कामायनी एक्सप्रेस, 12165 रत्नागिरी एक्सप्रेस, 11060 छपरा एक्सप्रेस, 51158 इटारसी -भुसावळ पॅसेंजर, 22948 भागलपुर-सुरत एक्सप्रेस,15646 गोव्हाटी एक्सप्रेस, 12533 पुष्पक एक्सप्रेस, 12628 कर्नाटक एक्सप्रेस, 11068 साकेत एक्सप्रेस यागाड्यामधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यात विना तिकिट 234 प्रवाशांकडुन 92 हजार 225 रुपये दंड वसुल करण्यात आला. अनियमित 241 प्रवाशांकडुन 1 लाख 14 हजार 230 रुपये, विनानोंदणी साहित्य नेणार्या 2 प्रवाशांकडुन 200 रुपये, रेल्वेत घाण पसरविणार्‍या 15 प्रवाशांकडुन 1 हजार 500 रुपये अशा 492 प्रवाशांकडून 2 लाख 12 हजार 185 रुपये दंड वसुल करण्यात आला.