सावदा शहरात चोरांचा उपद्रव कायम

0

सावदा। शहर आणि परिसरात भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे रहिवासी त्रस्त असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठेच आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण बसस्थानक, आठवडे बाजार परिसरासह चोरट्यांनी आता रहिवासी भागाला लक्ष केले आहे. नोव्हेंबर महिन्यात शहरातील स्वामीनारायणनगरात धाडसी घरफोडी झाली होती. यात लाखोंचा ऐवज लंपास झाला होता.

पोलीसांचे होतेय दुर्लक्ष
यातील आरोपी एलसीबीने गजाआड केले होते. यानंतरही किरकोळ चोर्‍यांचे सत्र कायम आहे. हे भुरटे चोर व्यावसायीक किंवा रहिवाशांनी घराबाहेर ठेवलेले साहित्य हातोहात लांबवतात. त्यात प्रामुख्याने वाहनांच्या बॅटरी, गॅस हंडी, पाण्याचे प्लास्टिकचे ड्रम आदी वस्तुंचा समावेश आहे. विशेष या चोर्‍या होवून रहिवासी नसता मनस्ताप टाळण्यासाठी पोलिसात तक्रार देणे टाळतात. तक्रार देण्यास गेल्यावर पोलिसांकडून उलट उपदेशाचे डोस मिळतात. या सर्व प्रकारांमुळे चोरट्यांचे फावले असले तरी सावदेकरांची अवस्था आडकित्त्यात सापडल्यासारखी आहे.