सावद्याची कन्या नेहा नारखेडे अब्जाधीश

स्वतः स्थापलेल्या कंपनीची पहिल्याच दिवशी अमेरिकन शेअर बाजारात कमाई

सावदा (दीपक श्रावगे)- सावद्याची मूळ रहिवासी व पुण्यात वाढलेली नेहा नारखेडे ही तरुणी अब्जाधीश झाली आहे. कुठलीही पार्श्वभूमी नसताना अमेरिकेत शिकायला जाऊन तिथे स्वकर्तृत्वावर ही तरुणी मोठी झाली. कॅलिफोर्नियातली कॉन्फ्लुएंट ही कंपनी अमेरिकेतल्या नॅस्डॅक या शेअर बाजारात गुरुवार, २४ जून रोजी लिस्ट झाली. ३६ डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे ८२८ दशलक्ष डॉलर उभे केले गेले. त्यामुळे कंपनीचं मूल्यांकन ९.१ अब्ज डॉलर एवढं झालं. शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास २५ टक्के वाढ झाली आणि ते मूल्य ४५.०२ डॉलर प्रति शेअर एवढं झालं. अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी आयपीओ आल्यानंतर हा एवढा भाव मिळवल्याने कॉन्फ्लुएंट कंपनीची जोरदार चर्चा झाली.
दोन संस्थापक अब्जाधीश
कंपनीचे भांडवली बाजारमूल्य ११.४ अब्ज डॉलर एवढं झो असून या कंपनीच्या तीन संस्थापकांपैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले आणि तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. नेहा नारखेडे तिसरी संस्थापक एक मराठी मुलगी आहे.