15,000 bribe demand case: Assistant inspector and sub-inspector released on bail भुसावळ : सावदा, ता.रावेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (52, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (32, रा.सावदा, ता.रावेर) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने लाच मागणी प्रकरणात मंगळवारी अटक केली होती. बुधवारी उभयंतांना भुसावळ सत्र न्यायालयाने एका दिवसांची पोलिस कोठडीनंतर संशयीतांना दुसर्या दिवशी गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची शर्टी व शर्थींना अधीन राहून जामिनावर सुटका करण्यात आली.
लाच मागणी प्रकरणी झाली होती कारवाई
सावदा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्कोच्या गुन्ह्यात संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी न करण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच मागणी उपनिरीक्षक गायकवाड यांनी इंगोले यांच्या वतीने केली होती. या प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी सकाळी दोघांवर अटकेची कारवाई केली. विशेष म्हणजे याचदिवशी सकाळी नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत क्राईम मिटींग असताना अधिकारी बैठकीला येण्याच्या तयारीत असतानाच एसीबीने संबंधिताना अटक केली. बुधवारी उभयंतांना भुसावळ न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर गुरुवारी त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.