स्वस्त धान्य वितरणातील अनागोंदी उघड
रावेर : स्वस्त धान्य वितरणात अनेक अनागोंदी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे व रावेर पुरवठा विभागाच्या निरीक्षकांसह सावदा मंडळाधिकार्यांनी 8 रोजी सावदा येथील साळीबाग भागातील स्वस्त धान्य दुकानदार भूषण सुधाकर सुरवाडकर यांच्या धान्य क्रमांक 12 ची तपासणी केल्यानंतर धान्याचे अयोग्य मार्गाने विल्हेवाट लावल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे स्वस्त धान्य वितरणात मनमानी करणार्या दुकानदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.