सावदा : सावदा पालिकेची प्रभाग रचना गुरुवारी जाहीर करण्यात आली. नव्या प्रभाग रचनेनुसार आता शहरात दहा प्रभाग करण्यात आले असून 20 नगरसेवक निवडून येणार आहेत. हरकती व सूचना मुख्याधिकारी यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभागनिहाय गुरुवार, 17 मार्चच्या दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत.
सावद्यात उमेदवार संभ्रमात
सावदा येथे प्रारूप प्रभाग रचना करतांना प्रभाग ज्या घरापासून वा ठिकाणाहून सुरू होतो व संपतो तेथील केवळ सिटी सर्व्हे नंबर नमूद करण्यात आल्याने लोकप्रतिनिधींच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वे नंबरमध्ये जागा वा घर कुणाचे आहे हे नमूद नसलयाने नेमका प्रभाग कसा? तो कोठून कोठे वळला याबाबाबत अनेक नागरीक तथा संभाव्य उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे त्यामुळे प्रभाग रचनेबाबत अनेक नागरीकांच्या तक्रारी येण्याची संभावना आहे.