सावद्यात कन्या शाळेत अज्ञात व्यक्तींकडून मुख्याध्यापिका दालनाची नासधूस

0

खिडकीतून फेकल्या रीकाम्या बियरच्या बाटल्या ; सावदा पोलिसात नोंद

सावदा – सावदा येथील नाना साहेब विष्णू हरी पाटील कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका कार्यालयाचे 28 रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी नुकसान केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीेने कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या कार्यालयाच्या खिडकीतून रीकाम्या झालेल्या बियरच्या बाटल्यांमध्ये रेती भरून त्या कार्यालयात फेकल्या यामुळे कार्यालयातील टी पॉय, लाईट व इतर वस्तू फुटल्याने सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार 29 रोजी सकाळी कार्यालय उघडल्यावर उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापिका मंगला डांगे तसेच न.पा. पदाधिकारी यांनी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी मुख्याध्यापिका मंगला डांगे यांच्या फिर्यादी वरून सावदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान ही शाळा मुलींची असून याठिकाणी रात्री असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळा ही पोलीस ठाणे पासून हाकेच्या अंतरावर आहे.