सावद्यात गंभीर दुखापतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय कामात अडथळा  : तिघांविरोधात गुन्हा

Obstructing the work of a nurse with a medical officer in Sawda : Offense against the trio
सावदा :
 सावदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकार्‍यांसह परीचारीकेच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून गंभीर दुखापतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी धमकावल्याप्रकरणी तिघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
संशयीत रवी जानराव पाटील (चिखली, ता.मुक्ताईनगर, ह.मु.सावदा), आकाश योगेश भंगाळे (19, चिनावल, ता.रावेर), चंद्रकांत गोपाळ पाटील (कोचूर, ता.रावेर) यांनी रविवार, 21 रोजी रात्री 10.30 वाजता सावदा ग्रामीण रुग्णालयात येत वैद्यकीय अधिकारी डॉ.निकिता भिरूड व तक्रारदार अधिपरीचारीका शकुंतला राजनाथ पाल (42) यांना गंभीर दुखापतीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आग्रह धरला व ते देण्यास नकार दिल्याने उभयंतांना दमदाटी करीत हुज्जत घालून शिविगाळ करणण्यात आली तसेच अंगावरही संशयीत धावून आले.

सावदा पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी शकुंतला पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात सावदा पोलिसात शासकीय कामकाजात अडथळा आणल्या गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.