सावद्यात गो रक्षकांवर प्राणघातक हल्ला : भाजपा शहराध्यक्षांसह तिघे जखमी

Cow guards attacked in Sawada after blocking a cattle transport vehicle सावदा : गुरांची वाहतूक करणारे वाहन रोखल्याच्या रागातून सावदा शहरातील गो रक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर जमाव संतप्त झाल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले. खबरदारी म्हणून जिल्ह्यावरून कुमक बोलावून शहरात शांतता प्रस्थापीत करण्यात आली. या प्रकरणी जमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ संशयीतांना अटक करण्यात आली.