सावदा- चंपाषष्टी व श्रध्दास्थानी असलेल्या खंडोबाच्या देवस्थानात यात्रे निमित्त येळकोट-येळकोट जय मल्हारच्या जय घोषात बारागाड्या मोठया उत्साहात ओढण्यात आल्या. खंडोबारायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. सालाबादप्रमाणे यंदाही पुरातन काळापासून असलेल्या खंडोबाच्या देवस्थानात यात्रेनिमित्त भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रेत मुलांच्या मनोरंजनाच्या विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने थाटण्यात आली. विविध प्रकारच्या हॉटेल्स, खेळण्यांची दुकाने लावण्यात आली होती. विविध रंगांचे लहान-मोठे पाळणे आदी स्टॉल लावण्यात आले. अशोक पवार, भगत बुवा यांनी काळी मंदिरात अभिषेक पूजन करून आरती केली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली व सायंकाळी सहा वाजता मंदिराचे समोरच्या प्रांगणावर बारागाड्या ओढण्यात आल्या. भाविकांनी भगवान खंडोबाच्या जय घोषात येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात बारागाड्या ओढल्या. निलेश खाचणे, शाम पाटील गणेश माळी, मनीष भंगाळे, नोमा भंगाळे, मेघा धांडे बारागाड्या ओढण्यासाठी सहकार्य केले. सुरज परदेशी, ईश्वर कुरकुरे, संतोष पाटील, वसंत भिरूड, आकाश वंजारी यांची उपस्थिती होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल, उपनिरीखक आखाडे व सहकार्यांनी बंदोबस्त राखला.