सावदा- थोरगव्हाण मार्गावरील लहान वाघोदा नाल्यात महाकाय झाडाखाली प्रतिदिनी 52 पत्त्याचा झन्ना-मन्ना जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक सचिन कदम यांना मिळाल्यानंतर 24 रोजी दुपारी पाच वाजता धाड टाकत सहा जुगार्यांना अटक करीत एक लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दुर्गादास धांडे, आमीन खान हाफीस खान, दिलीप रामा चांदेलकर, फिरोज बाबू तडवी, प्रमोद मुरलीधर पाटील, अनिल कचरू जवरे यांना अटक करण्यात आली तसेच दोन मोटारसायकली, मोबाईल जप्त करण्यात आला.