सावद्यात तडवी समाजाच्या मेळाव्यात 14 जोडप्यांचे शुभमंगल

0

आदिवासी एकता मंचचा उपक्रम ; सामूहिक सोहळे काळाची गरज -रक्षा खडसे

सावदा- आदिवासी तडवी समाजाने सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना प्रत्यक्षात राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. अशा प्रकारचे उपक्रम ही काळाची गरज आहे, असे विचार खासदार रक्षा खडसे यांनी येथे व्यक्त केले. आदिवासी एकता मंचातर्फे येथे तडवी समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी 14 जोडपी विवाहबद्ध झाली.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, उपनगराध्यक्षा शबाना तडवी, शेख हरून शेख इकबाल, पंकज येवले, एम. बी. तडवी, शेरखा तडवी, मुराद तडवी, नगरसेवक आदी उपस्थित होते.

चालीरीतींना फाटा ; उपक्रमाचे कौतुक
आजच्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबात मुला-मुलींचे लग्न करणे खर्चिक बनले आहे. अत्यंत अल्प खर्चात विवाह करणे काळाची गरज आहे. याकरीता आदिवासी एकता मंचच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून जोडप्यांचे लग्न लावून समाजातील सर्व चालीरीतीने फाटा देऊन आदर्श विवाह सोहळा पार पडला. समाजातील दानशूर लोकांनी यासाठी सहकार्य केले. वधू-वरांना संसार उपयोगी भांडे, कपडे मोफत देण्यात आले. या उपक्रमाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमस्थळी एकूण 80 मंडपची व्यवस्था करण्यात आली होती. चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील समाज बांधवांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.