सावदा : अंगणात सांडपाणी आल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दाम्पत्यास धुणे धुण्याच्या मोगरीने मारहाण करण्यात आलेली तसेच महिलेच्या डोक्यावर वीट मारून फेकण्यात आल्याची घटना बोहरा मशीदीमागील भोईवाडा भागात 27 रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी माय-लेकाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
माय-लेकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी मिराबाई राजाराम राणे (65, भोईवाडा, सावदा) यांच्या फिर्यादीनुसार कमलाबाई रघुनाथ चौधरी व त्यांचा मुलगा दीपक रघुनाथ चौधरी (भोईवाडा, सावदा) यांच्याविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदारांच्या अंगणातील सांडपाणी पाणी आरोपींच्या अंगणात आल्यानंतर कमलाबाई यांनी शिविगाळ करीत अंगणातील वीट मिराबाई यांच्या डोक्यावर मारली तसेच राजाराम राणे हे आरोपीला समजावत असताना दीपक चौधरी याने शिविगाळ केली तसेच कपडे धुण्याच्या मोगरीने मिराबाई यांना मारहाण करण्यात आली तसेच दाम्पत्याला दोघा आरोपींना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तपास सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पाटील करीत आहेत.