सावदा : शहरात अवैधरित्या दारूची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी टाकलेल्या धाडीत तब्बल दोन लाख रुपयांची देशी दारू जप्त केली. मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील चर्मकार वाड्याजवळील रहिवासी सचिन उर्फ सत्या नामदेव ठोसर याच्या घराजवळील एका घरातून बेकायदेशीर मद्याचा साठा जप्त करण्यात आला.