सावद्यात पाणीपुरवठा योजनेतील सहा चेंबरमध्ये बिघाड

0

सावदा : नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील 24 इंची जल वाहिनीच्या चेंबरमध्ये बिघाड झाला असून पाणीपुरवठा विभागाने दुरूस्तीसाठी काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी पाणीपुरवठा निरीक्षक जितेश पाटील, पांडुरंग पाटील, बंडू बेंडाळे, धनराज पाटील आदी कर्मचार्‍यांना तातडीने समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. सावदा-थोरगव्हाण रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रातील 24 इंची जल वाहिनीचे सहा चेंबर पूर्णपणे ब्लॉक झाले आहेत. फिल्टरेशनचे पाणी बाहेर फेकले जात असल्याची प्रक्रिया बंद पडल्याने शुध्द पाणीपुरवठा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शहरात शुध्द व नियमित पाणीपुरवठा मिळावा म्हणून चेंबर दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. दुरूस्तीसाठी वेळ लागल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे माध्यमातून कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरीकांनी दखल घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पांडुरंग पाटील यांनी केले आहे.