सावद्यात फिरत्या लोक अदालतीत 15 खटल्यांचा निपटारा

0

मोफत विधी सहाय्य हे न्यायदान प्रक्रियेचे एक महत्वाचे अंग न्या.आर.एल.राठोड

फैजपूर- सावदा येथे 17 रोजी आयोजित ‘न्याय आपल्या दारी’ फिरते विधी सेवा व लोक अदालत योजनेंतर्गत लोक अदालत घेण्यात आली. याप्रसंगी 15 खटल्यांचा निपटारा करण्यात आला. अध्यक्षस्थानी रावेर दिवाणी न्यायालयाचे न्या.आर.एल.राठोड होते. मोफत विधी सहाय्य हे न्यायदान प्रक्रियेचे एक महत्वाचे अंग असून त्याचे उद्दिष्ट समाजातील दुर्बल व पददलित घटकांना न्याय मिळून देणे, असल्याचे त्यांनी सांगत यामुळे वेळ व पैसादेखील वाचतो त्यामुळे या लोक अदालतीचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डिसेंबर महिन्यात रावेर येथे महालोक अदालत होणार असून यात देखील जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सावद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनीदेखील मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
विधीत्ज्ञ व्ही.पी.महाजन, विधीतज्ञ डी.डी. ठाकूर, विधीतज्ञ सुभाष धुंधले, न्यायालयीन कर्मचारी ए.वाय. पठाण, ईश्वर चौधरी, पी.बी.चव्हाण, एस.सी.इंगळे, चव्हाण. बडगे, आर.एस.निभोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.