सावद्यात शेतमजुराने मृत्यूला कवटाळले ; जोशीवाड्यात शोककळा

0

सावदा- शहरातील मोठा आड परीसरातील जोशी वाड्यातील रहिवासी असलेले शेतमजूर लतेश प्रभाकर वाघुळदे (50) यांनी बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. घरात एकटे असताना दरवाजाला आतून कडी लावून घेत वाघुळदे यांनी गळफास घेतला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. ऐन दिवाळीच्या दिवशी झालेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण जोशी वाड्यात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी रवींद्र मोरे, अमजदखान पठाण, विनोद पाटील, युसूफ तडवी हे घटनास्थळी आले. मात्र, लतेश वाघुळदे यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या का केली? याचे कारण समोर आले नाही. मृतदेह रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. वाघुळदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी असा परीवार आहे. कल्पेश व भावेश वाघुळडे यांचे ते वडील होत.