सावद्यात 11 रोजी विहिंपची हुंकार सभा

0

अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत राष्ट्रीय संयोजक सोहम सोलंकी करणार मार्गदर्शन

भुसावळ- रावेर तालुक्यातील सावदा येथे विश्‍व हिंदू परीषदेच्या भव्य हुंकार सभेचे 11 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले आहे. संपूर्ण देशातील हिंदू आस्था व अस्मितेचा विषय असलेल्या अयोध्या येथील श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करण्याच्या हेतूने देशभरात विहिंपतर्फे हुंकार सभांचे आयोजन केले जात आहे. याचसाठी भुसावळ विभागातील हुंकार सभा सावद्यात 11 रोजी दुपारी चार वाजता येथील सावदा-फैजपूर जुन्या रोडवरील रेस्ट हाऊस समोरील पटांगणावर होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी नुकतीच सिद्धीविनायक मंदिरात बैठक घेण्यात आली. सभेसाठी अभ्यासपूर्ण व सुक्ष्म नियोजन करून कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, सावदा येथील सभेला भुसावळ विभागातील हजारो हिंदू बांधव उपस्थित राहून श्रीराम मंदिर निर्माणचा हुंकार भरणार आहे.

राष्ट्रीय संयोजक करणार सभेत मार्गदर्शन
या सभेला बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक सोहमजी सोलंकी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याच प्रमाणे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज (सतपंथी मंदिर), भक्ती प्रकाशदाजी (स्वामी नारायण गुरुकुल), सुरेश शास्त्री मानेकर (महानुभाव मंदिर), स्वरुपानंददासजी स्वामी (डोंगरकठोरा) तसेच साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थिती देवून संबोधित करणार आहे. या सभेला यशस्वी करण्यासाठी विहिंपचे विभाग मंत्री कैलास गायकवाड, भुसावळ जिल्हा पालक दादा सिंगत, प्रांत सत्संग प्रमुख नारायण घोडके, भुसावळ जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, जिल्हा सह कार्यवाहक अ‍ॅड.कालिदास ठाकूर यांच्यासह भुसावळ जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.