सावद्यात 32 वर्षीय इसमाची आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील सावदा येथील बौद्ध वाड्यातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय इसमाने गळफास घेत आत्महत्या केली. 27 रोजी सकाळी 11.30 पूर्वी ही घटना घडली. नयन मधुकर सोनवणे (32, बौद्धवाडा, सावदा) असे मयत इसमाचे नाव आहे. या इसमाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. याबाबत सावदा पोलिसात मयुर सुधाकर सोनवणे (23, बौद्धवाडा, सावदा) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश आखाडे, हवालदार विनोद पाटील करीत आहेत.