सावद्यासह मुक्ताईनगरात खासदार राऊतांच्या पुतळ्याचे दहन

मुक्ताईनगर : सेनेतील राजकीय भूकंपानंतर आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर दररोज राज्यात नवनवीन घडामोडी घडत असताना रविवारी बंडखोर केलेल्या आमदारांच्या विरोधात खासदार संजय राऊत यांनी अतिशय बेताल व हिन दर्जाचे वक्तव्य केल्याने त्याचा सावद्यासह मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले.

सावदा येथे संजय राऊत यांचे पुतळ्याचे दहन*
सावदा : शिवसेनेतून बंड करून सुमारे 50 आमदार बाहेर पडले असून ते माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटी येथे जावून सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी अत्यंत खराब भाषा वापरून टीका केल्याचा सावद्यातील कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. सोमवारी दुपारी 12 वाजता बसस्थानक परीसरात शिंदे गटात सामील झालेल्या मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील समर्थकानी खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध घोषणादेखील देण्यात आल्या. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील समर्थक शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, मनीष भंगाळे, येडू लोखंडे, बंटी लोखंडे, शेख मुश्ताक, शाहरुख तडवी, अश्रफ तडवी, नितीन सपकाळे, दीपक सोनार, नितीन चौधरी, चेतन माळी, गणेश माळी आदी उपस्थित होते.

मुक्ताईगरातही जाळला पुतळा
मुक्ताईनगर : शहरातील प्रवर्तन चौकात सोमवारी आमदार चंद्रकांत पाटील समर्थकांनी खासदार संजय राऊत यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. रविवारी संजय राऊत यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून राऊत यांचा पुतळा जाळण्यात आला तसेच संजय राऊत यांनी शिवसेना संपवली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील जे निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहिल, असे समर्थकांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत मराठे, संतोष माळी, दीपक जोगी, संजय तळेले, मनोज मराठे, अशोक कुंभार, राजु कापसे, दिलीप गायकवाड, अमोल पालवे, रफीक खाटिक, उमेश चव्हाण, साबीर पटेल, जितु पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.