रावेर (प्रतिनिधी) : काल सावद्या नंतर रावेर शहरात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला असून एक 58 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पोझिटीव्ह आला आहे.यामुळे शहरवासीयांचे टेंशन वाढले आहे. तर भगवती नगर भाग सिल करण्याची कारवाई सुरु झाली आहे.
आरोग्य विभागा कडून मिळालली माहिती अशी की मागिल चार पाच दिवसां पासुन या भागातील एका 58 वर्षीय व्यक्तीला खोकला, सर्दी,तापचे लक्षणे जानवले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्याचे स्लॅब तपासणी साठी पाठवले आज त्यांच्या रिपोर्ट पोझिटीव्ह आला आहे.तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे वैद्यकीय अधिकारी डॉ एन डी महाजन, सिईओ रविंद्र लांडे आपल्या सहकार्यसह स्पॉटवर जाऊन तेवढा भाग सिल करण्याची कारवाई सुरु झाली आहे. तसेच पोझिटीव्ह व्यक्तीच्या कोन-कोन संर्पकात आला आहे.याच प्रशासन शोध घेऊन कोरटाइन करणार आहे.