सावधान ! … चीप बेस एटीएम बदलताना होऊ शकते फसवणूक

0

नागरिकांनी खबरदारी पाळण्याचे बँका, पोलिसांकडून आवाहन

एटीएम पासवर्ड, 16 आकडी नंबरबाबत माहिती शेअर करु नका

ऑनलाईन खात्यावर पैसे लांबविण्याचा धोका

जळगाव – शहरासह राज्यात सध्या सर्व बँकानी मॅस्ट्रोचे जुने एटीएम कार्ड बदलवून चीप बेस एटीएम कार्ड बंधनकारक केले आहे. मात्र कुणी भामटे एटीएम बदलण्याचे सांगत फोनवरुन आपला एटीएम पिन, नंबर विचारत असेल तर सावधान… यात काही सेंकदात खात्यावरुन रक्कम लांबवून आपली फसवूणक होवू शकतेे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन बॅका तसेच सायबर क्राईम शाखेकडून करण्यात येत आहे आवाहन करण्यात येत आहे.

आजच्या काळात कोण कुणाची कशी फसवणूक करेल काहीच सांगता येत नाही. ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्याचा सपाटा सध्या ऑनलाइन चोरांनी लावला असल्याचे गेल्या काळात घडलेल्या विविध सायबर क्राईमच्या घटनांवरुन मधून समोर येते. अशाच प्रकारच्या घटना घडू नये यासाठी खबरदारी हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या सर्वच बँकांनी ए टी एम कार्ड बंद करून नवीन एटीम कार्ड देण्याचे जाहीर केले आहे . काहींना ते प्राप्त देखील होत आहे.31 डिसेंबर पर्यंत चीप बेस एटीएम एटीम कार्ड बदलविण्यासाठी शेवटची मुदत आहे. यातच बँकांचा संप आणि सुट्यामुळे ऑनलाइन चोरटे फायदा घेऊ शकतात.

कशी होवू शकते फसवणूक
ऑनलाइन हेरगिरी करणार्‍या चोरांकडून कुणाच्याही मोबाईलवर संपर्क साधला जातो. यात बँक कर्मचारी असल्याची बतावणी करत, आपले कार्ड बदलविण्यासाठी आपला एटीम पिन सांगा कार्ड नंबर सांगा अशी विचारणा होवू शकते. अशा प्रकारे सायबर फ्रॉड करणारे लोक ग्राहकांकडून मोबाईल वर डेबिट कार्ड, आधार नंबर घेऊन ते क्लोनिंग करतात आणि त्याचा ओटीपी ते स्वता जनरेट करतात. व आपल्या खात्यातील रक्कम काही सेकंदातच लंपास करतात. अमक्या खात्यात अमकी रक्कम भरा असे भावुक आवाहनही केले जाऊ शकत असल्याची माहिती मिळाली आहे.

कशी घ्याल खबरदारी
बँकांचा संप आणि त्यातही मधल्या सुट्या यामुळे असा एटीएम बदललण्याबाबतचा फोन बँका करूच शकणार नाही. ग्राहकांनी मोबाईल नंबर वरून आलेल्या कॉल ला प्रतिसाद देवू नये. कोणतीही बँक फोनवरुन खात्याची, एटीएमची माहिती विचारत नाही. त्यामुळे कुणीही एटीएमची किंवा खात्याची माहिती शेअर करु नये. मॅग्नेटिक चीफ चे एटीएम सध्या सुरु होणार आहे आणि जुने एटीएम बंद होणार आहे. ग्राहकांनी या सर्वांबाबत बँकेत येऊन शहानिशा करावा व वेळीच खबरदारी घेत फसवणुकीपासून बचाव करा.

कोट-

कोणतीही बँक फोनवरुन खात्याबाबत, माहिती विचारत नाही, नागरिकांनी खबरदारी घ्यावी. कुणालाही आपल्या खात्याची व एटीएमवरील क्रमाकांची तसेच पासवर्डची माहिती देवू नये. फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवा.

अरुण निकम, पोलीस निरिक्षक सायबर गुन्हे शाखा.