काही महिन्यात सायबर पोलिसात 15 ते 17 गुन्हे दाखल
जळगाव : फेसबुक, व्हॉटसअॅपचे बनावट खाते तयार करुन संबंधितांच्या मित्र परिवाराला दवाखान्याचे कारण पुढे करुन, मुलगी आजारी आह,े पैशांची गरज आहे, अशी कारणे सांगून ऑनलाईन गंडविणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही महिन्यांमध्ये अशाप्रकारे सायबर पोलीस ठाण्यात 15 ते 17 गुन्हे दाखल झाले असून एका दिवसाआड जिल्ह्यात फसवणुकीची घटना घडत आहे. फसवणूक होणार्यांमध्ये तरुण, शासकीय नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, वकील यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी, कर्मचार्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे काही घटनांवरुन समोर आले आहे. गुन्हे दाखल होत असले तरी या घटनांमध्ये गुन्हेगार निष्पन्न होत नाही. निष्पन्न झाले तरी फसवणुकीची रक्कम मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करतांना खबरदारी हाच सध्यस्थितीत ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्याचा उपाय आहे.
ही कारणे सांगून करतात फसवणूक
दिवसेंदिवस काळ बदलत चालला आहे, त्याबरोबरच गुन्हेगाराची पध्दतही बदलत चालली आहे. व्यवहाराबाबत गुगल पे, फोन पे सारखे अॅपचा नागरिकांकडून वापर वाढला आहे. बँकेतून बोलतोय, तुमचे एटीम कार्ड खराब झाले आहे, तुमचे एटीएमकार्ड ब्लॉक होणार आहे, तसेच तुमचे मोबाईलचे कार्ड बंद करण्यात येत असून त्यासाठी ेकेवाएयसी करायचे आहे, अशा पध्दतीने कारणे सांगून सायबर चोरटे संबंधितांना संपर्क क्रमांक साधतात. विश्वासात घेतल्यावर एटीएमकार्डचा सोळा आकडी नंबर मिळवून, यानंतर आधारकार्ड नंबर व ओटीपी किंवा पिन मिळवितात. व पिन किंवा ओटीपी क्रमांक सांगतात, काही वेळातच संबंधिताच्या बँके खात्यात असलेली सर्व रक्कम ऑनलाईन दुसर्या खात्यावर वर्ग होते. याबाबतचा संदेश प्राप्त झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येतो. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.
बारकोड स्कॅनव्दारे फसवणुकीचा नवा फंडा
काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील गांधी नगर येथील सेवानिवृत्त शिक्षकेला जीओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून केवायएसी करण्याचे सांगत ओटीपी मिळविला व महिलेची 30 ते 40 हजारात फसवणूक झाली होती. यात महिलेला संबंधित सायबर चोरट्याने बारकोड पाठवून ते स्कॅन करण्यास सांगितले होते. स्कॅन करताच महिलेची फसवणूक झाली.याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. रामानंदनगर परिसराती इंजिनिअरचे शिक्षण घेणार्या तरुणाने त्याची महागडी सायकल ओलएक्सच्या माध्यमातून विक्री करण्याचा प्रयत्न केला. या तरुणाला सायबर चोरट्याने हेरले. सायकल खरेदी करावयाची सांगत, तरुणाच्या मोबाईलवर बारकोड
पाठविला, बारकोड स्कॅन करा, पैसे मिळतील अशा थापा मारल्या. तरुणाने बारकोड स्कॅन करताच पैसे तर आले नाही, उलत तरुणाच्या खात्यावरु 25 ते 30 हजार रुपये दुसर्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचा संदेश तरुणाला प्राप्त झाला. याबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
फेसबक बनावट खाते तयार करुन गंडा
आता फेसबुक, व्हॉटस्अॅपचे चक्क बनावट खाते तयार करुन गंडविणारी टोळी सक्रिय झाली आहे. यात संबधित सायबर चोरटे हे संबंधिताचे फे्रन्डलिस्ट, प्रोफाईल फोटो असे सेम टू सेम खाते बनवितात. व या खात्याव्दारे संबंधिताच्या फे्रेडलिस्टमधील असलेल्यांना मोबाईलवर संपर्क साधून, मुलगी दवाखान्यात आजारी आहे, अपघात झाला पैशांची गरज आहे. असे सांगतात. याबाबतचे संदेशही पाठविले जातात. आपला मित्रच आपल्याला पैसे मागतोय, याप्रमाणे भासवून सायबर चोरटे तीन ते पाच हजारांची मागणी करुन गंडवितात. भुसावळ तालुक्यातील खडका येथील शामसिंग पाटील यांचे बनावट फेसबुकचे खाते तयार करुन संबंधितांनी त्याच्या फेसबुकच्या फे्रन्डलिस्ट मधील एका शिक्षकाला फोन केला. व शामसिंग पाटील यांच्या मुलाचा अपघात झाला असल्याचे भासवून तीन हजार रुपये मागितले. मित्र शामसिंगच आपल्याला पैसे मागतोय, असे समजून शिक्षकाने संबंधिताने पाठविलेल्या फोनपेवर चटकन तीन हजार रुपये पाठविले. यानंतर काही वेळाने शामसिंग पाटील यांच्याशी संबंधितांचे बोलणे झाल्यावर प्रकार समोर आला. त्यांनी तत्काळ याबाबत ऑनलाईन तसेच सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.
व्हॉटसचे बनावट खाते करुन वकील, सीएला गंडविले
फेसबुकप्रमाणेच व्हॉटस्अॅपचे बनावट खाते तयार करण्यात येवून गृप तसेच संपर्क क्रमांक मिळवून त्याव्दारे संदेश पाठवून किंवा संपर्क साधून रुग्णालयाचे कारण सांगितले. स्टेटस, फोटो नाव, याप्रमाणे मित्र परिवाराला किंचितही शंका येणार नाही असे खाते तयार केले जाते. या हुबेहुबे खात्यामुळे रुग्णालयाचे कारण सांगून पैशांची मागणी करणारा हा आपला मित्रच असावा या विश्वासाने लगेच पैसे पाठविले जातात. मात्र काही वेळाने फसवणुकीचा प्रकार समोर येतो. ज्याचे बनावट खाते तयार केले जाते, तो याबाबत अनभिज्ञ असतो. संबंधिताला प्रकार माहिती पडेपर्यंत सायबर चोरट्याने त्याच्या चार ते पाच मित्रांकडून पैसे उकळलेले असतात. अशाप्रकारे एका वकीलाची व दोन दिवसांपूर्वी एक सीएची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.
सेवानिवृत्त पोलीस अधिकार्याच्या खात्यावरुन सलग चार महिने पैसे काढले
दुसर्या जिल्ह्यात सेवा बजावलेला तसेच जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकाच्या बॅकेच्या खात्यावरुन सायबर चोरट्याने तब्बल चार महिन्यात 35 हजार रुपये काढल्याचे समोर आले. विशेष म्हणजे याबाबत सायबर चोरट्याने कुठलाही संपर्क साधला नाही, किंवा ओटीपी किंवा पीन क्रमांक मागितला नाही. पोलीस निरिक्षकाने बँकेचे खाते प्रिन्ट केल्यावर प्रकार समोर आला. यात तब्बल चार महिन्यांपासून सायबर चोरट्याने रोज ठराविक रक्कम काढून ऑनलाईन शॉपिंग, रेल्वे तिकिट याप्रकारे पैसे काढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे दोन रुपयेही खात्यातून काढले आहे. याबाबत संबंधित पोलीस निरिक्षकाने बुधवारी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाणे होते.
कोट
ऑनलाईन फसवणुकीच्या नवनवीन घटना समोर येत आहे. अज्ञात व्यक्तींचा कुणाकडूनही संबंधितांकडून पैशांची मागणी होत असेल, किंवा काहीती आपल्या बॅकेच्या खात्यासंबंधी माहिती विचारली जात असेल तर प्रतिसाद देवून नका. आपली आर्थिक व्यवहाराबाबतची गोपनीय माहिती सार्वजनिक करु नका, फोनमधील अॅपव्दारे व्यवहार करतांना सावधनता बाळगा. आपली फसवणूक झाली असेल सायबर पोलीस ठाण्यात तक्रार द्या.
बळीराम हिरे, पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस स्टेशन