शिवकॉलनीत खिडकीतून मोबाईसह पाकीट तर शाहू नगरातून घरातून मोबाईल लांबविला
जळगाव- घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने घरात घुसून महागडा मोबाईल लांबविल्याची घटना 31 रोजी सायंकाळी 5.54 वाजेच्या सुमारास घडली. मोबाईल लांबविणार चोरटा घरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचदिवशी रामानंदनगर परिसरातही खिडकीतून मोबाईल व पाकिट लांबविल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरात भरदिवसा घरात घुसून एैवज लांबविणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
शाहूनगर येथे व्यापारी राजेश रघुवीर गुप्ता हे पत्नी व दोन मुले अशा कुटूंबासह राहतात. त्यांचा स्विट, नमकीन विक्रीचा व्यवसाय आहे. 31 रोजी दुपारी गुप्ता हे पत्नी व मुलगा इशानसह वरच्या मजल्यावर झोपण्यास गेले. तर आकाश हा खालच्या रुममध्येच झोपला. त्याने त्याचा मोबाईल पलंगावर ठेवला होता. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्याने आकाशचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविला. आकाश झोपेतून उठल्यावर प्रकार उघड झाला.
सीसीटीव्हीत चोरटा कैद
चोरीची खात्री झाल्यावर गुप्ता यांनी त्यांच्या घराबाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले. यात एक अनोळखी इसम सायंकाळी 5.54 वाजेच्या सुमारास उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करत आहे. व 5.58 वाजेच्या सुमारास बाहेर पडताना दिसून येत आहे. अवघ्या चार मिनिटात भामट्याने मोबाईल लांबविला. याप्रकरणी राजेश गुप्ता यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवकॉलनीत खिडकीतून हात टाकून लांबविला एैवज
शिव कॉलनीतील संजय जगताप यांच्या घरात भाड्याने राहत असलेले दिपांशू आरोडा यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व रोख 300 रुपये लंपास केल्याची घटना 31 रोजी घडली. रात्री 11:30 ते काम काटोपून घरी आले असता. झोपण्या आधी त्यांनी 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व पाकीट त्यात 300 रुपये टेबलावर ठेवून ते झोपी गेले. दिपांशू हे दुसर्या दिवशी दि. 1 एप्रिल रोजी झोपेतून उठले असता टेबलवर मोबाईल व पाकीट आढळून आले नाही. शोध घेवूनही मोबाईल व पाकिट न मिळाल्याने अखेर त्यांनी रामानंद पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिल्याने आज्ञत चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस विश्वनाथ गायकवाड करीत आहे.