सावरकरांना भारतरत्न देण्यास कॉंग्रेसचा विरोध नाही; डॉ.मनमोहन सिंग यांचे मोठे वक्तव्य

0

मुंबई: भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून कॉंग्रेसकडून विरोध होत आहे. दरम्यान माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस सावरकरविरोधी नाही असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होते आहे या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी केलेले महत्त्वाचे आहे.

इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण केले होते ही आठवणही मनमोहन सिंग यांनी करून दिली.

कर्नाटकात कॉंग्रेसचे आंदोलन
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. याला विरोध होत आहे. कर्नाटकात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शेन केली.