मुंबई । स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहयोगाने पंतनगर, नायडू कॉलनी येथील गणेशोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा तसेच त्यांच्या विचारांचा देखावा उभारण्यात आला आहे. या देखाव्यास शिव सहकार सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तृतीय क्रमांकांचे पारितोषिक मिळाले आहे. सामाजिक जनजागृती व देशभक्ती या विषयामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी या सजावटीसाठी मार्गदर्शन केले. तसेच स्मारकाचे व्यवस्थापक संजय चेंदवणकर यांनी ही सजावट केली आहे.
यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ रणजित सावरकर व मंजिरी मराठे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर पाटील हेही याप्रसंगी उपस्थित होते.