सावरकर, गोडसे यांच्यावरील लिखाण चुकीचे: नवाब मलिक

0

मुंबई: कॉंग्रेस सेवा दलाने लिहिलेल्या पुस्तकावरून वादंग उठले असून, भाजपाने यावर टीका करत पुस्तक मागे घेण्याचे सांगितले होते. कॉंग्रेसच्या सेवा दलाच्या पुस्तकात सावरकर आणि गोडसे यांचे शारीरिक संबध होते असे लिखाण केले होते. यावर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. सावरकर, गोडसे यांच्यावरील लिखाण चुकीचे असून कॉंग्रेसने आपले बुकलेट मागे घ्यावे असे त्यांनी सांगितले आहे.

नवाब मलिक यांनी सावरकर, गोडसे यांच्यावरील लिखाणाबाबत आक्षेपार्ह असून, असे लिहणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच वैचारिक मतभेद ठीक आहे, परंतु वैयक्तिक टिप्पण्या केल्या जाऊ नयेत. विशेष म्हणजे जेव्हा सावरकर जिवंत नसतांना आक्षेपार्ह लिखाण चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने आपले बुकलेट मागे घ्यावे असे त्यांनी सांगितले आहे.