सावरकर विटंबनेच्या निषेधार्थ हिंदू महासभेची निदर्शने

0

मुंबई । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिंदूमहासभेच्या वतीने दादर येथील कबुतरखाना भागात निदर्शने करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श मानणार्‍या भाजप आणि शिवसेनेची सत्ता केंद्रात आणि राज्यात आहे. सीमेवर युद्धसदृश स्थिती आणि राज्यात दहशतीचे वातावरण आहे. राज्यातील अलीकडील कोरेगाव भीमा प्रकरणांनतर संभाजीनगर येथील सावरकर पुतळ्याच्या विटंबनेसारख्या घटना सामाजिक शातंता बिघडवत आहेत.

त्यामागील दोषींवर त्वरित कारवाई करण्यास सरकार अपयशी ठरल्याने असे प्रकार वाढत आहेत, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यवीर सावरकराच्या पुतळ्याची विटंबना होते. ही बाब अक्षम्य आहे. प्रशासनाने केलेल्या पुतळ्याच्या साफसफाईने झालेला अवमान भरून येऊ शकत नाही. याची नोंद घेऊन शासनाने तत्परता दाखवावी यासाठी हिंदू महासभेची ही निदर्शने करण्यात आल्याचे प्रदेश कार्यवाह दिनेश भोगले यांनी दिली आहे.