सावळदा परिसरात नदीपात्रातून गाळ काढल्याने पातळीत वाढ

0

शहादा । तालुक्यातील सावळदा येथील फाट्याजवळ असलेली मोठी खाडी कवळीथ येथुन गोमाइ नदीच्या पात्रतुन काढण्यात आली आहे. हा पाण्याचा पाट कार्यान्वित केल्याने पूर्णतः काठोकाठ भरुन अक्षरशः सावळदा गावाला लागुन वरुळ कानडी रस्त्यावर पाणी वहात आहे. यापाण्यामुळे सावळदा परिसरात जमिनीत पाण्याची पातळी वाढली असुन शेकडो बोअरवेल जिवंत झाले आहेत. यामुळे गावकरी व शेतकरी आनंदी झाले आहे. शहादा येथील श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग च्या कार्यकर्त्यांनी व जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मोठ्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे. गेल्या चाळीस वर्षात प्रथमच कवळीथ येथील पाट नव्याने सुरु करण्यात आला हा पाट खोल करुन पूर्णतः सफाई केली व जिल्हाधिकार्‍यांचा हस्ते जलपुजन करण्यात आले होते.

11 वर्षानंतर भरले पूर्ण पात्र
याव्यतिरिक्त तालुक्यातील इतर पाण्याचे पाट सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत या पाटाचे पाणी कवळीथपासुन सावखेडा, डोंगरगाव, शहादा ,सावळदा, वरुळ कानडी, ससदेपर्यंत पोहोचले आहे. सावळदा फाट्याजवळ मोठा बंधारा खाडी सारखा आहे साधारण एक कि .मी. लांबीचा 20 ते 25 फुट खोल असुन पूर्णतः पाण्याने भरला आहे दोंडाईचा रस्त्याने जाणारे वाहनधारक पाणी बघुन थांबतात तर काही सेल्फी देखील काढतात . 2006 मध्ये अतिवृष्टी झाली होती आता त्याचानंतर अकरा वर्षानी 2017 मध्ये पाटाचा पाण्यामुळे पूर्ण भरला आहे.