सावळदे येथे मधमाशी पालन व प्रशिक्षणसंबंधी प्रात्यक्षिक

0

शिरपूर । सपना मधमाशी प्रशिक्षण व संशोधन केंद्र विना ऑर्गेनिक फार्मस् दोंडाईचा यांच्या शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील उपशाखेच्या वतीने रविवारी 10 रोजी मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्री फाट्यालगत असलेल्या जागृती हायटेक नर्सरीत मधमाशी पालन व प्रशिक्षण संबंधी प्रात्याक्षिक कार्यक्रमाचे आरोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईचा येथील उद्योगपती सरकारसाहेब रावल हेे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून रोजगार हमी पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल, जिल्ह्याचे पालक मंत्री ना.दादाभुसे, खामदार डॉ.हिना गावित, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, तुषार रंधे, गंगाधर माळी, हृषिकेश रावल, विक्रांत रावल, शिप्राराणी रावल हे उपस्थित राहणार आहेत.