शिरूर । अनेक हालअपेष्टा सहन करून बहुजन समाजाला व महिलांना शिक्षित करण्यासाठी स्री शिक्षणाच्या आद्यक्रांतीकारक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अथक परीश्रम केलेले असून त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याची गरज आजच्या शिक्षण पध्दतीला असल्याचे मत चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्रा. ईश्वर पवार यानी व्यक्त केले.पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या आद्यक्रांतीकारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंती निमित्त शिरुर येथे शिवसेवा मंडळ सभागृहात अभिवादन सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रा. पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा शोभना पाचंगे, नगरपरीषद शिक्षण समितीच्या सभापती रोहिणी बनकर, नगरसेविका रेश्मा लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पल्लवी शहा, मंजुश्री थोरात, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग थोरात, भाजपचे केशव लोखंडे आदिंसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संपूर्ण देशासाठी दिशादर्शक
महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्य संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज महिलांना सन्मान मिळत आहे, असे यावेळी पुढे माहिती सांगताना प्रा. ईश्वर पवार म्हणाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माधव सेनेचे रविंद्र सानप, समता परीषदेचे किरण बनकर, संजय कौठाळे, सतीश गवारी, माजी सरपंच प्रकाश थोरात, दिनेश भुजबळ, राजू खेतमाळीस, राजेंद जाधव, मास्टर भुजबळ, माऊली कोल्हे, आनंद भुजबळ, ग्राहक पंचायतीचे दिनकर साबळे, उद्योजक दत्तात्रय शेलार, आकाश पटवेकर यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक अशोक शेळके सर यांनी तर सूत्रसंचलन संजय बारवकर यांनी केले.