एरंडोल । येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव संचलित सावित्रीबाई फुले इंग्लिश मेडियम स्कूल एरंडोल येथे ‘ख्रिसमस डे’ व डान्स स्पर्धा नुकतेच घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन, चेअरमन योगेश देवरे (महाजन), सुदर्शन महाजन, अमोल देशमुख, प्रदीप चौधरी, सचिन महाजन, किशोर महाजन व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांताक्लोजचे पोशाख व नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करुन आपआपल्या कलागुणांना वाव दिला. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश चौधरी यांनी केले. तसेच शाळेचे प्राचार्य विजय पाटील, यांनी पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शीतल पवार, शितल महाजन, रुपाली गांगुर्डे, करुन मनवर इत्यादी शिक्षकांनी परिश्रम घेतले व ललिता माळी यांनी आभार मानले.