पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय

0

पुणे:– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपले शैक्षणिक वर्ष येत्या 15 जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबर पासून तर या पूर्वीच अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टला सुरू करण्याचा सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना शैक्षणिक वर्ष तातडीने सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्याशाखेतील सायन्स, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फार्मसी आणि मॅनेजमेंट विद्याशाखेतील कॉमर्स अभ्यासक्रम 15 जून पासून इंटरडिसीपलरी विद्याशाखेच्या अभ्यासक्रम 1 जुलै पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध अभ्यासक्रमांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहे. तसेच निकाल बाकी आहेत. बॅकलॉग विषयाचा परीक्षा होणार की नाही याची चिंता असतांना हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. एन.एस. उमराणी यांनी शैक्षणिक वर्षाला सुरुवात म्हणजे प्रशासकीय कामकाज 15 जून पासून करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठ, महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रकियांची तयारी करावी लागेल; तसेच अनेक प्रशासकीय कामे असल्याने हे सुरू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याचा क्लासरूम टीचिंगशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.