जैताणे । साक्री तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर व नावलौकिक असलेली क्रांतिज्योति सावित्रीबाई फूले महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 3 री वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेच्या चेअरपर्सन सायंकाबाई हरी माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषद सदस्या इंदूबाई वेडू खैरनार यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन व फुले दाम्पत्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संचालक मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. शंकरद्वार भवनात आयोजित वार्षिक सभेत पतसंस्थेचे संस्थापक, मानद सचिव पंढरीनाथ सोनवणे यांनी आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतिचा आढावा सभागृहात मांडला. पतसंस्थेला चालु आर्थिक वर्षाखेर 10 लाख 2 हजार 226 रुपयाचा निव्वळ नफा असल्याचे सांगितले.
संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मंजुरी
संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार नफा वाटनीस सभेत मंजुरी देण्यात आली. या प्रसंगी जैताणेचे सरपंच संजय वेडू खैरनार, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, कैलास भदाने, प्रदीप शाह, शोबाबाई दौलत भदाने, निर्मलाबाई सुधाकर माळी यांनी सहकाराचे महत्व आणि बचत या विषयावर मार्गदर्शन केले. वार्षिक सभेला संचालक मंडळ, सभासद भगिनी, सहकारी मित्र तसेच रत्नाबाई जगदाळे, संगीता भदाने, तारा सोनवणे,सुनीता खैरनार, कल्पना भलकारे, संगीता सोनवने, वैशाली श्रीवास्तव, संगीता खैरनार, कल्पना भदाने, अनीता जाधव, अलकाबाई जयस्वाल, भालचंद्र कोठवदे, रावण जगदाळे, दशरत आणा, राहूल जयस्वाल, बापू भलकारे, अनिल श्रीवास्तव आदींची उपस्थित होती. प्रस्ताविक नवल खैरनार व आभार पंढरीनाथ सोनवणे यांनी मानले. यशस्वितेसाठी कर्मचारी दिपक शिंदे, किशोर जयस्वाल, जगदीश बागुल, मोहन बागुल व छोटू जाधव यांनी परिश्रम घेतले.