निंभोरा । ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात समान संधी केंद्रा मार्फत 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जे.बी. अंजने होते, तर प्रमुख वक्ते प्रा.डॉ.रेखा पाटील होत्या, त्यांनी सावित्रीबाईच्या जीवनातील समस्या व जीवन कार्याची महती सांगितली. तसेच प्रा.व्ही.एन.रामटेके यांनी सावित्रीबाई फुले यांचे महिला शिक्षण कार्याबद्दल माहिती सांगितली.
स्त्री विकासाचा रोवला पाया
तसेच प्रा.एस.पी.उमरीवाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल बोलताना म्हटले की, स्त्री, शुद्र, आणि बहुजनातील अज्ञान व अंधश्रद्धा शिक्षणाच्या अस्त्राने दूर करण्याचा प्रयत्न केला याचा आढावा घेतला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी फुले दांपत्याने स्त्रीशिक्षण, शेतकरी आणि शूद्रातिशूद्र यांना ज्ञानाच्या माध्यमाने जागृत करण्याचे कसे प्रयत्न केले आणि समाज जागृत करण्यासाठी सामाजिक विटंबनेचा त्रास सहन केला. आजच्या आधुनिक काळातील स्त्री विकासाचा पाया रोवला गेला आणि आधुनिक काळातील स्त्री सशक्त बनली असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा.एस.पी. उमरीवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.व्ही.एन. रामटेके यांनी केले. कार्याक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र व मानसशास्त्र विभागामार्फत करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.आर.बी. खंडारे, प्रा.दिलीप सोनावणे, प्रा. डॉ.एन.एस. वाणी सहकार्य केले व विध्यार्थ्यानी कार्यक्रमाचा लाभ घेतला.