कष्ट करण्यामागे स्त्री कधीच मागे नसते, काकणभर पुढेच असते मात्र समाजात द्वेषाची आग भडकते तेव्हा होरपळते पहिल्यांदा स्त्री,भोगावं लागतं ते स्त्रीयांनाचं. आपण सर्वांनी निर्धार करायला हवा स्वतः साठी,उद्याच्या पिढीसाठी,धर्मावरून ,जातीवरून ,भाषेवरून होणारी भांडणं, द्वेष रोखण्यासाठी. सावित्री,ज्योतिबांची आखलेल्या रस्त्यावरून चालण्यासाठी. 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली तिला 170 वर्ष होताहेत. 2017 ला अलविदा करीत नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या मूड मध्ये आपण सारे आहोत.थर्टीफर्स्ट कशा प्रकारे साजरा करायचा याचे प्लॅन सुरू असतील.त्याला आणि नवीन वर्षाला शुभेच्छा देत असताना, नव्या वर्षातील पहिल्या उत्सवाची आठवण करून द्यायची आहे.
नव्या वर्षातला पहिला उत्सव !
3 जानेवारी हा म सावित्री बाई फुले म यांचा जन्म दिवस. शेणा,दगडांचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट ती चालत राहिली म्हणूनच आज आपली प्रशस्त वाट तयार झाली….. त्या वाटेवरून चालताना सावित्रीची आठवण तर जागवायलाच हवी. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्री बाईचा जन्म झाला.उद्या येणारी ही त्यांची 187 वी जयंती आहे. योतिबा फुलेंची पत्नी, विद्यार्थिनी, शिक्षिका, मुख्याध्यापिका, कवियत्री अशा विविध भूमिकेमध्ये सावित्री बाई वावरल्या. सावित्रीबाईचा पहिला पहिला काव्यसंग्रह हा म काव्य फुले म 1854 साली प्रसिध्द झाला तर म बावनकशी सुबोध रत्नाकर म हा दुसरा काव्यसंग्रह 1891 मध्ये प्रसिध्द झाला.त्यानी सामाजिक कविता सोबत पिवळा चाफा,जाईचे फुल,गुलाबाचे फुल,फुलपाखरू अशा कविता लिहिल्या.
पिवळा चाफा
नेत्र नासिका
रसिक मनाला
तृप्त करून
मरून पडतो
किंवा
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनी चालत नाही
तयास मानव म्हणावे का ?
अशा सारख्या सामाजिक आशयाच्या कविता त्यानी लिहिल्या.स्फुट लेखनही त्यानी केलेले आहे. आपण सावित्री बाईंचं,त्यांच्या सहशिक्षिका फातिमा शेख,अहिल्या देवी,जिजाबाई यांची नावे घेतो, त्यांचे स्मरण करतो. परंतु घरा मध्ये,ऑफिसमध्ये, सत्तेमध्ये स्त्रियांना किती वाटा देतो.तिला मिळणारी वागणूक ही बरोबरीची सन्मानाची असते का ? सर्व थरातल्या स्त्रियांना सत्ता आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. आणि यासाठी या निमित्ताने काही संकल्प करण्यासाठी हे उत्सव साजरे करायचे असतात.कष्ट करण्यामागे स्त्री कधीच मागे नसते,काकणभर पुढेच असते मात्र समाजात द्वेषाची आग भडकते तेव्हा होरपळते पहिल्यांदा स्त्री,भोगावं लागतं ते स्त्रीयांनाचं. आपण सर्वांनी निर्धार करायला हवा स्वतः साठी,उद्याच्या पिढीसाठी,धर्मावरून ,जातीवरून ,भाषेवरून होणारी भांडणं, द्वेष रोखण्यासाठी. सावित्री,ज्योतिबांची आखलेल्या रस्त्यावरून चालण्यासाठी.
1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली तिला 170 वर्ष होताहेत. दगडूशेठ गणपती समोर असलेल्या या शाळेची आज अवस्था दयनीय आहे.ही ऐतिहासिक वास्तू जतन केली पाहिजे याचे कालच्या किंवा आजच्या राज्यकर्त्याना भान नाही. पण आपल्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचे काय ? ज्या देशात मंदिरासाठी विटा आणि पैसे गोळा केले जातात त्या देशात सावित्री बाईंच्या पहिल्या शाळेसाठी काहीच होत नाही याची खंत वाटते.सावित्री बाई या जशा पहिल्या शिक्षिका तशीच उस्मानशेठ यांची बहीण फातिमा शेख या ही त्यांच्या पहिल्या सहशिक्षिका.या दोघींचे ऋण आपल्यावर आहेत.त्यानी दाखविलेल्या रस्त्यामुळे आज आपण इथ पर्यंत पोहचू शकलो. आज माझी आई, माझी पत्नी,मुलगी शिकली ती केवळ सावित्री मुळे. म्हणून तिचे स्मरण करण्यासाठी राष्ट्र सेवा दल गेली काही वर्षे महाराष्ट्रात सावित्री उत्सवा चे आयोजन करीत असते.सावित्रीच्या लेकी आम्ही, मागे आता राहणार नाही असे सांगत मुंबई,कल्याण,उल्हासनगर, पुणे, मालेगाव, अकोला, वर्धा, इचलकरंजी, सातारा, अमरावती, अहमदनगर आदी ठिकाणी सावित्री उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शाळा, कॉलेज, सोसायटी, वस्ती आदी ठिकाणी आपण सवित्रीबाई फुले यांची जयंती करीत असतोच परंतु राष्ट्र सेवा दल, कायद्याने वागा लोक चळवळ सारख्या संघटना हा जन्मदिवस स्वतःपासून,घरापासून साजरा करण्याचा आग्रह धरतात. या दिवशी दारात कंदील, दरवाज्याला फुलांचे तोरण, घरासमोर रांगोळी, घरात गोडधोड, पुस्तकाची खरेदी आणि दारात ज्ञानाची एक पणती, मेणबत्ती लावून सावित्री उत्सव साजरा करायचा आहे.
– शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702