सासरच्यांना मिळाला अटकपूर्व जामीन

0

पिंपरी- शेअर मार्केट ट्रेडींग कंपनीत मॅनेजर पदावर कामाला असल्याचे सांगून लग्न करून फसवणूक केली. तसेच वंशाला दिवा पाहिजे या कारणावरुन शिक्षिका असलेल्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी एका 30 वर्षीय विवाहित शिक्षिकेने पती अविनाश भगवान निकम, सासरे भगवान दिनकर निकम, सासू शालन भगवान निकम तसेच डॉ.ज्योती भगवान निकम, दिपक भगवान निकम, सारिका दिपक निकम, डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर (सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी) आणि डॉ. मनिषा राजेंद्र खेडेकर (रा. नारायण पेठ, पुणे) यांच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेचा 2014 मध्ये संत तुकारामनगर येथील अविनाश निकम यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह झाला. लग्नापूर्वी अविनाश हा पुण्यातील निर्मल बंग सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या शेअर मार्केट ट्रेडींग कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरीस असल्याचे खोटे पीडित महिलेला व तिच्या कुटुंबियांना सांगण्यात आले होते. लग्नानंतर पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच पतीला व्यवसाय करण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असा पीडितेला तगादा लावला. त्यातच मुलगा हवा म्हणून तिला त्रास देत होते. त्यामुळे तीने तक्रार दाखल केली होती.